द प्रॉब्लम् ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन (मराठी: रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे. तो त्यांनी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येडॉक्टर आफ सायन्स (डी.एस.सी.)च्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता. हा प्रबंध डिसेंबर, १९२३ मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित झाला. या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे की, मुद्रा समस्याच्या अंतिम निर्णयात, कशा प्रकारे ब्रिटिश शासकांनी भारतीय रुपयाच्या किमतीला पाऊंडसोबत जोडून आपला जास्तीत-जास्त फायदा होण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या या हेराफेरीनेच भारतीय नागरिकांना गंभीर आर्थिक समस्येत लोटले गेले. ब्रिटिश शासकांच्या या निर्णयामुळे, भारतीय धन ब्रिटिश खजिन्याच्या दिशेने निरंतर वळवले गेले. या व अशा अनेक प्रकारे भारतातली संपत्ती ब्रिटिश सरकारच्या व ब्रिटिश जनतेच्या फायद्यात जात राहिली.[१]