समता सैनिक दल

समता सैनिक दलची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २४ सप्टेंबर इ.स. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.

पुरस्कार

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!