डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार |
---|
प्रयोजन |
सामाजिक क्षेत्रातील योगदान |
---|
Venue |
दिल्ली |
---|
देश |
भारत |
---|
प्रदानकर्ता |
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार |
---|
प्रथम पुरस्कार |
१९९३ |
---|
शेवटचा पुरस्कार |
२०१४ |
---|
Currently held by |
बाबू लाल निर्मल अमर सेवा संगम |
---|
संकेतस्थळ |
http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html |
---|
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२]
पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.[१]
हा पुरस्कार इ.स. १९९३, १९९४, १९९६ व १९९८ मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर २० वर्षांनी इ.स. २०११, २०१२ व २०१४चे पुरस्कार २६ मे इ.स. २०१७ रोजी एकत्रित प्रदान करण्यात आले.[३]
उद्देश व निकष
हा पुरस्कार समाजात सामाजिक सदभाव निर्माण करण्यासाठी तसेच शोषित, पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपुर्व योगदान देण्यासाठी प्रदान केला जातो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येतो. पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामाकंन त्यांनी केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते. मागसवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले ही पुरस्कारर्थी निवडीमधील महत्त्वाची बाब आहेत.[१]
स्वरुप
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे आहे. भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान प्रदान करतात.[१]
पुरस्कार विजेते
हे सुद्धा पहा
संदर्भ