थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि इ.स. १९५५मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. डॉ. आंबेडकरांनी हे पुस्तक नागसेन वन, औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकाशे व प्रमुख जातीची आकडेवारीचे परिशिष्ट जोडले आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रीकरणाचे चित्रण केले आहे तसेच "एक राज्य एक भाषा" या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.[१]