२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.[१]