तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ हे 'तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी ॲक्ट, १९९६'च्या अंतर्गत तमिळनाडू सरकारद्वारे चेन्नई येथे इ.स. १९९७ मध्ये स्थापन केलेले एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपतीके. आर. नारायणन यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तमिळनाडूतील सर्व विधी-महाविद्यालये येतात. विद्यापीठाने २००२मध्ये आपल्या स्वतःच्या चेन्नईमधील कॅम्पसमध्ये कायद्याचे शिक्षण देणारे 'स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ'नावाचे एक विद्यालय सुरू केले.[१]