महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Province; मराठी: महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ३७ पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. बी.सी. कांबळे यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.[१][२]