भीम ध्वज किंवा निळा ध्वज (इतर नाव: आंबेडकर ध्वज) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीक असलेला निळ्या रंगाचा ध्वज आहे. बौद्ध विहारांवर, दलित चळवळीतील संस्था, घरे, गाड्यां इत्यादींवर लावण्यात येतो. अशोकचक्र चिन्हांकित हा निळा ध्वज दलित-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित, सभा इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो.[ संदर्भ हवा ] हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः नवयानी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद निळा असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे, कारण आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी आजीवन समतेसाठी संघर्ष केला आणि त्यामुळे निळा रंग हा या ध्वजाचा रंग स्वीकारलेला गेला आहे. निळा ध्वज हा आंबेडकरी चळवाळीची अस्मिता मानला जातो, तसेच निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतिक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते.[ संदर्भ हवा ] अनेकदा या ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात. तसेच काही ध्वजावर आंबेडकरांचे चित्र सुद्धा असते. बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचा म्हणजे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा ध्वज होता. सध्या बाबासाहेबांची संकल्पना असलेला पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा ध्वज आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या "समता सैनिक दलाचा" निळा ध्वज आहे.[ संदर्भ हवा ]