कास्ट्स इन् इंडिया : देअर मेकनिझम, जेनसिस अँड डिव्हेलपमण्ट (मराठी: भारतातील जाती : त्यांची संरचना, उत्पत्ती आणि विकास) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला एक समाजशास्त्रीय लेख आहे, जो त्यांनी मे, इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील एका सेमिनारमध्ये वाचला होता. या लेखामुळे जगाला बाबासाहेबांच्या रूपात एक २५ वर्षीय तरुण 'भारतीय समाजशास्त्र' जगाला गवला तसेच भारतातील जातीव्यवस्थेतीची किड संपूर्ण जगापुढे उघड झाली. नंतर हा इ.स. १९१७ मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला. याच्या अंतर्गत भारतात जातींची उत्पत्ती, गठन व विकास यावर प्रकाश टाकला गेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या नजरेत, जाती एक असा परिबद्ध वर्ग आहे, जो स्वतः पुरताच मर्यादित राहतो. त्यांच्या अनुसार जाती समस्येचे चार पक्ष आहेत -
(क) हिंदू लोकसंख्येत विविध तत्त्वांचे संमिश्रण असतांनाही यात दृढ सांस्कृतिक एकता आहे.
(ख) जातीं या विराट सांस्कृतिक चतुर्थांचे अंग आहे.
(ग) सुरुवातीला केवळ एकच जात होती.
(घ) देखा देखी किंवा बहिष्कारामुळे विभिन्न जाती बनल्या.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी