थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बहुचर्चित ग्रंथ आहे. हा राजकीय ग्रंथ इ.स. १९४०च्या डिसेंबरमध्ये प्रकाशित झाला. या वेळी भारताच्या फाळणीवरून संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या ग्रंथाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.[२] याची दुसरी आवृत्ती इ.स. १९४५च्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया (पाकिस्तान अथवा भारताची फाळणी) या नावाने प्रकाशित करण्यात आली. पुढे इ.स. १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तान राष्ट्र उदयास आहे. या ग्रंथाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, "पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हणले जाऊ शकते."[३]