दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरशहरात आहे.इथे बुद्ध धम्माचे स्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या धम्म ची रचना केली या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबरइ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयानबौद्ध धम्माचीदीक्षा दिली होती.[१] त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हणले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हणले जाते.
दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात.[२] भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.[३][४][५]
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खूसुरई ससाई यांनी म्हणले आहे की, “दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.” भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला 'मानवतेचे प्रेरणास्थान' म्हणले आहे.[६] ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे’, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.[७][८]
इतिहास
सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना गेला. विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर१९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्त्वडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानानाची ओळख बनली. दरवर्षी येथे बरेच बौद्ध लोक बुद्ध, बाबासाहेब व दीक्षा अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. इथे एक भव्य स्तूप निर्माण केला गेला, बावीस प्रतिज्ञांचा स्तंभही अभारला गेला. येथे बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खूणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेला.
रचना
दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.
दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात.त्यावेळी येथे १५ ते २० लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील, विषेशतः महाराष्ट्रातील मुख्य राजकीय नेते सणात सहभागी होतात; जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही उपस्थित राहतात.[९][१०]