गया

गया
भारतामधील शहर

बोधगयामधील महाबोधी मंदिर
गया is located in बिहार
गया
गया
गयाचे बिहारमधील स्थान

गुणक: 24°47′30″N 84°59′30″E / 24.79167°N 84.99167°E / 24.79167; 84.99167

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा गया जिल्हा
क्षेत्रफळ ९०.१७ चौ. किमी (३४.८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६४ फूट (१११ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,६८,६१४
  - घनता ४,७५,९८७ /चौ. किमी (१२,३२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


गया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील गया जिल्ह्याचे मुख्यालय व पाटणा खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गया शहर पाटणाच्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले असून ते हिंदू, बौद्धजैन धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान आहे. इ.स.२०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६८ लाख होती. हिंदीसोबतच येथे मगधी ही भाषा देखील वापरली जाते.

बोधगया हे स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ स्थळांपैकी एक आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. ऐतिहासिक काळात मगध प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.

गया विमानतळ बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे. येथून यांगून, भूतान, बँकॉक इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. गया रेल्वे स्थानक हावडा-मुंबईदिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्गावर स्थित असून येथे दररोज राजधानी एक्सप्रेससह सुमारे १०० गाड्या थांबतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!