डॉ.राजरत्न अशोक आंबेडकर (जन्म: ८ डिसेंबर १९८२) हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि या माध्यमातून ते बौद्ध धर्माच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम करतात.
राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ आनंदराव यांचे पणतू, मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुतणे) यांचे नातू तर अशोक आंबेडकर यांचे पुत्र होत.[१]
शिक्षण
राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन २००८ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲंन्ड फायनन्शल अकाउंटंडंट ऑफ इंडिया - देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन २००८ मध्ये एडीएम व सन २०१० मध्ये एमबीए झाले. व्यवस्थापनात ॲडव्हान्स्ड पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.[२][३]
२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपूर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याद्वारे श्रामणेर दीक्षा ग्रहन केली होती. त्यानंतर त्यांचे "धम्म आंबेडकर" असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना गुजरात (संकल्प भूमी) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.[३][११]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बौद्ध' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी 'दलित' व 'नवबौद्ध' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत यशवंत आंबेडकर यांनीही मांडले होते.[१२]
आंबेडकर आडनावाचा खरा इतिहास त्यांनी जगासमोर मांडला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी संपूर्ण माहितीचा आढावा घेत, सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला प्राप्त केला.[ संदर्भ हवा ] त्यामध्ये "भिवा रामजी आंबेडकर" अशी नोंद आहे. आणि सोबतच त्यांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांचा देखील दाखला प्राप्त केला. त्यांच्या नावाची नोंद "लक्ष्मण रामजी आंबेडकर" अशी नोंद आहे.[ संदर्भ हवा ] त्यांचा प्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच वर्षे आधी झाला होता. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे, व त्यात शेवटी कर शब्द जोडत असे. आंबडवे गावावरून आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते अवघड वाटत होते. म्हणून त्यांचे वडील शुभेदार रामजी आंबेडकर यांनी विचारपूर्वक सुचवून "आंबेडकर" असे आडनाव नोंदविले. ही त्यांची देण आहे याचे संपूर्ण श्रेय "सुभेदार रामजी आंबेडकर" यांना जाते. साताऱ्यातील प्रतापसिंह स्कूल मध्ये कोणत्याही ब्राम्हण आंबेडकर गुरुजींचा उल्लेख नाही.[ संदर्भ हवा ]
^Quack, Johannes (2011). Disenchanting India: Organized Rationalism and Criticism of Religion in India. Oxford University Press. p. 88. ISBN978-0199812608. OCLC704120510.