बोधिसत्व (बोधिसत्व) म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे व्यक्ती होय. ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.बुद्ध होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानवास बौद्धीसत्त्व असे म्हणतात
प्रसिद्ध बोधिसत्व
आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधिसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधिसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.
बोधिसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग ( jar) आहे.
बोधिसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.
बोधिसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.