बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे.[१][२]जय भीम या अभिवादनाची सुरुवात हरदास यांनी केलेली आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी मध्येही प्रदर्शित झालेला आहे.[३][४][५][६][७]