त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
इतिहास
त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.
भूगोल
यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे
त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.
त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.
चित्रदालन
संदर्भ