मिझोरम

मिझोरम
भारताच्या नकाशावर मिझोरमचे स्थान.
भारताच्या नकाशावर मिझोरमचे स्थान.
भारताच्या नकाशावर मिझोरमचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २० फेब्रुवारी १९८७
राजधानी ऐझॉल23°22′N 92°48′E / 23.36°N 92.8°E / 23.36; 92.8
सर्वात मोठे शहर ऐझॉल
जिल्हे
लोकसभा मतदारसंघ
क्षेत्रफळ २१,०८१ चौ. किमी (८,१३९ चौ. मैल) (२४ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
१०,९१,०१४ (२७वा)
 - ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

कंभमपती हरी बाबू
लालदुहोमा
विधानसभा (४०)
गुवाहाटी उच्च न्यायालय
राज्यभाषा मिझो
आय.एस.ओ. कोड IN-MZ
संकेतस्थळ: mizoram.gov.in

मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मिझोरम राज्याची स्थापना १९८७ साली आसाम राज्याला विभागून केली गेली. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०८१ चौ.किमी एवढे आहे तर लोकसंख्या १०,९१,०१४ एवढी आहे. मिझोइंग्रजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. मिझोरम मध्ये मिझो जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात. मिझोरममधील बहुतेक भू-भाग डोंगराळ स्वरूपाचा असून शेती हा येथील प्रमुख उद्योग आहे. त्यासोबतच पशुपालनरेशीम हे येथील जोड व्यवसाय आहेत. मका, चहाकडधान्ये ही येथील मधील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता जास्त म्हणजे ९१.५८ टक्के एवढी आहे. साक्षरतेच्या बाबतीत मिझोरमचा भारतात दुसरा (पहिला केरळ) क्रमांक लागतो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!