भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येनुसार सूची


भारतातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या येथे नोंदवली आहे. २०२४ पर्यंत, अंदाजे १.४८४ अब्ज लोकसंख्येसह, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.[] भारताने जगात फक्त २.४% क्षेत्र व्यापले आहे पण जगातील १७.५% लोकसंख्या येथे आहे.

आकडेवारीचा सारांश

भारतीय लोकसंख्येची गणना पहिल्यांदा ब्रिटीश काळात १८७२ मध्ये झाली आणि स्वातंत्र्यानंतर १९५१ पासून दर १० वर्षांनी जनगणना होते.[] गृह मंत्रालयाच्या देखत असलेल्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त हे काम करतात व हे केंद्र सरकारच्या कामांमधील सर्वात मोठ्या व व्यापक कामांपैकी एक आहे.[]

नवीनतम लोकसंख्येचे आकडे भारताच्या २०११ च्या जनगणनेवर आधारित आहेत. २००१-११ च्या दशकात, भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर २.१५% वरून १.७६% टक्क्यांवर घसरला आहे. दशवार्षिक जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवचा सर्वात वेगवान वाढ ५५.१% टक्के आहे व त्यानंतर पुडुचेरी (२८.१%), मेघालय (२७.९%) आणि अरुणाचल प्रदेश (२६%) आहे. नागालँडने सर्वात कमी (-०.६%) लोकसंख्या वाढ नोंदविली आहे.[] सर्वाधिल लोकसंख्याचे राज्य हे उत्तर प्रदेश असून केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली पहिली आहे. पहिली ५ राज्ये (उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश) मिळून देशाच्या जवळपास निम्मी (४७.९३%) लोकसंख्या आहे. राज्यांमध्ये सर्ताव कमी लोकसंखा सिक्कीमची असून लक्षद्वीप हा सर्वात कमी वस्तीचा केंद्रशासित प्रदेश आहे. देशाची राजधानी व प्रगत शहर असल्याने दिल्लीची घनता सर्वाधिक आहे तर थंड ओसाड व उंचावर वसलेल्या लडाखची घनता कमी आहे.

भारतात ६,४१,००० वस्ती असलेली ग्रामीण गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६८% लोक या ग्रामीण भागात राहतात. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या हिमाचल प्रदेश (~९०%) असून सर्वात कमी ही राजधानीचे केंद्रशासित प्रदेश दिल्लीत (२.५%) आहे.[] १९९१-२००१ च्या दशाकात झालेल्या औद्योगिकीकरणाने शहरी लोकसंख्येत वाढ झाली व लहान खात्यावर, सरकारने इतर लहान शहरे आणि गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.[][] महाराष्ट्रात सर्वाधिक २३ लाख स्थलांतरित लोक वसले असून, त्यानंतर दिल्ली (१७ लाख), गुजरात (६.८ लाख) आणि हरियाणा (६.७ लाख) होते. आंतरराज्यीय स्थलांतरीतांच्या यादीत उत्तर प्रदेश (२६ लाख) आणि बिहार (१७ लाख) शीर्षस्थानी आहेत.[]

यादी

भारताची जनगणना २०११ अनुसार
क्र. राज्य लोकसंख्या[][] % बदल
(२००१ ते २०१२)
ग्रामीण शहरी घनता लिंग गुणोत्तर
संख्या % संख्या %
१ (रा १) उत्तर प्रदेश १९९,८१२,३४१ १६.५१% २०.२% १५५,३१७,२७८ ७७.७३% ४४,४९५,०६३ २२.२७% ८२८ ९१२
२ (रा २) महाराष्ट्र ११२,३७४,३३३ ९.२८% १६% ६१,५५६,०७४ ५४.७८% ५०,८१८,२५९ ४५.२२% ३६५ ९२९
३ (रा ३) बिहार १०४,०९९,४५२ ८.६% २५.४% ९२,३४१,४३६ ८८.७१% ११,७५८,०१६ ११.२९% १,१०२ ९१८
४ (रा ४) पश्चिम बंगाल ९१,२७६,११५ ७.५४% १३.८% ६२,१८३,११३ ६८.१३% २९,०९३,००२ ३१.८७% १,०२९ ९५३
५ (रा ५) मध्य प्रदेश ७२,६२६,८०९ ६% २०.३% ५२,५५७,४०४ ७२.३७% २०,०६९,४०५ २७.६३% २३६ ९३१
६ (रा ६) तमिळनाडू ७२,१४७,०३० ५.९६% १५.६% ३७,२२९,५९० ५१.६% ३४,९१७,४४० ४८.४% ५५५ ९९६
७ (रा ७) राजस्थान ६८,५४८,४३७ ५.६६% २१.३% ५१,५००,३५२ ७५.१३% १७,०४८,०८५ २४.८७% २०१ ९२८
८ (रा ८) कर्नाटक ६१,०९५,२९७ ५.०५% १५.६% ३७,४६९,३३५ ६१.३३% २३,६२५,९६२ ३८.६७% ३१९ ९७३
९ (रा ९) गुजरात ६०,४३९,६९२ ४.९९% १९.३% ३४,६९४,६०९ ५७.४% २५,७४५,०८३ ४२.६% ३०८ ९१९
१० (रा १०) आंध्र प्रदेश ४९,५७७,१०३ ४.१% ११.०% ३४,९६६,६९३ ७०.५३% १४,६१०,४१० २९.४७% ३०३ ९९३
११ (रा ११) ओडिशा ४१,९७४,२१९ ३.४७% १४% ३४,९७०,५६२ ८३.३१% ७,००३,६५६ १६.६९% २६९ ९७८
१२ (रा १२) तेलंगणा ३५,००३,६७४ २.८९% १३.५८% २१,३९५,००९ ६१.१२% १३,६०८,६६५ ३८.८८% ३१२ ९८८
१३ (रा १३) केरळ ३३,४०६,०६१ २.७६% ४.९% १७,४७१,१३५ ५२.३% १५,९३४,९२६ ४७.७% ८५९ १,०८४
१४ (रा १४) झारखंड ३२,९८८,१३४ २.७३% २२.४% २५,०५५,०७३ ७५.९५% ७,९३३,०६१ २४.०५% ४१४ ९४८
१५ (रा १५) आसाम ३१,२०५,५७६ २.५८% १७.१% २६,८०७,०३४ ८५.९% ४,३९८,५४२ १४.१% ३९८ ९५८
१६ (रा १६) पंजाब २७,७४३,३३८ २.२९% १३.८९% १७,३४४,१९२ ६२.५२% १०,३९९,१४६ ३७.४८% ५५१ ८९५
१७ (रा १७) छत्तिसगढ २५,५४५,१९८ २.११% २२.६% १९,६०७,९६१ ७६.७६% ५,९३७,२३७ २३.२४% १८९ ९९१
१८ (रा १८) हरियाणा २५,३५१,४६२ २.०९% १९.९% १६,५०९,३५९ ६५.१२% ८,८४२,१०३ ३४.८८% ५७३ ८७९
१९ (प्र १) दिल्ली १६,७८७,९४१ १.३९% २१.२% ४१९,०४२ २.५% १६,३६८,८९९ ९७.५% ११,२९७ ८६८
२० (प्र २) जम्मू आणि काश्मीर १२,२६७,०३२ १.०१% २३.६% ९,०६४,२२० ७३.८९% ३,२०२,८१२ २६.११% २९७ ८९०
२१ (रा १९) उत्तराखंड १०,०८६,२९२ ०.८३% १८.८% ७,०३६,९५४ ६९.७७% ३,०४९,३३८ ३०.२३% १८९ ९६३
२२ (रा २०) हिमाचल प्रदेश ६,८६४,६०२ ०.५७% १२.९% ६,१७६,०५० ८९.९७% ६८८,५५२ १०.०३% १२३ ९७२
२३ (रा २१) त्रिपुरा ३,६७३,९१७ ०.३% १४.८% २,७१२,४६४ ७३.८३% ९६१,४५३ २६.१७% ३५० ९६०
२४ (रा २२) मेघालय २,९६६,८८९ ०.२५% २७.९% २,३७१,४३९ ७९.९३% ५९५,४५० २०.०७% १३२ ९८९
२५ (रा २३) मणिपूर २,५७०,३९० ०.२१% २४.५% १,७९३,८७५ ६९.७९% ७७६,५१५ ३०.२१% १२२ ९९२
२६ (रा २४) नागालॅंड १,९७८,५०२ ०.१६% −०.६% १,४०७,५३६ ७१.१४% ५७०,९६६ २८.८६% ११९ ९३१
२७ (रा २५) गोवा १,४५८,५४५ ०.१२% ८.२% ५५१,७३१ ३७.८३% ९०६,८१४ ६२.१७% ३९४ ९७३
२८ (रा २६) अरुणाचल प्रदेश १,३८३,७२७ ०.११% २६.०% १,०६६,३५८ ७७.०६% ३१७,३६९ २२.९४% १७ ९३८
२९ (प्र ३) पुडुचेरी १,२४७,९५३ ०.१% २८.१% ३९५,२०० ३१.६७% ८५२,७५३ ६८.३३% २,५९८ १,०३७
३० (रा २७) मिझोरम १,०९७,२०६ ०.०९% २३.५% ५२५,४३५ ४७.८९% ५७१,७७१ ५२.११% ५२ ९७६
३१ (प्र ४) चंदिगढ १,०५५,४५० ०.०९% १७.२% २८,९९१ २.७५% १,०२६,४५९ ९७.२५% ९,२५२ ८१८
३२ (रा २८) सिक्कीम ६१०,५७७ ०.०५% १२.९% ४५६,९९९ ७४.८५% १५३,५७८ २५.१५% ८६ ८९०
३३ (प्र ५) दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव ५८५,७६४ ०.०५% ५५.१% २४३,५१० ४१.५७% ३४२,२५४ ५८.४३% ९७० ७११
३४ (प्र ६) अंदमान आणि निकोबार ३८०,५८१ ०.०३% ६.९% २३७,०९३ ६२.३% १४३,४८८ ३७.७% ४६ ८७६
३५ (प्र ७) लडाख २७४,००० ०.०२% १७.८% ४३,८४० १६% २३०,१६० ८४% २.८ ८५३
३६ (प्र ८) लक्षद्वीप ६४,४७३ ०.०१% ६.३% १४,१४१ २१.९३% ५०,३३२ ७८.०७% २,०१३ ९४६
एकूण भारत १,२१०,५६९,५७३ १००% १७.७% ८३३,४६३,४४८ ६८.८४% ३७७,१०६,१२५ ३१.१६% ३८२ ९४३

संदर्भ

  1. ^ "Census and you - Area And Population". 2007-12-26. 26 December 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Census Organisation of India". Government of India (2001). Census of India. December 1, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Brief history of census". Government of India (2001). Census of India. 2013-11-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-26 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Archived copy" (PDF). The Hindu. 2013-11-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.CS1 maint: archived copy as title (link)
  5. ^ Shinde, Swati (13 Sep 2008). "Migration rate to city will dip". The Times of India. 5 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-12-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Develop towns to stop migration to urban areas: economist". The Hindu. Chennai, India. Dec 3, 2005. December 5, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-08 रोजी पाहिले.
  7. ^ "Migration". Government of India (2001). Census of India. 2013-11-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-26 रोजी पाहिले.
  8. ^ "List of states with Population, Sex Ratio and Literacy Census 2011". www.census2011.co.in. 2023-04-30 रोजी पाहिले.
  9. ^ "Census 2011: Population in States and Union Territories of India". Jagranjosh.com. 2016-10-14. 2023-04-30 रोजी पाहिले.
इतर माहिती

भारत जनगणना २००१ Archived 2005-11-23 at the Wayback Machine.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!