मराठी बौद्ध किंवा महाराष्ट्रीय बौद्ध हा महाराष्ट्रातीलबौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषिक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्यात ६५ लाख बौद्ध असून यातील ९९% पेक्षा अधिक बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध आहेत. तर सुमारे ५३ लाख बौद्ध हे अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहेत. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे.
इतिहास
१४ ऑक्टोबरइ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. इ.स. १९५१च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ (०.०१%) होती. आणि इ.स. १९६१ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ (७%) झाली. यात प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला होता. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही १६% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) सुद्धा म्हणले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आहेत.
उल्लेखनीय व्यक्ती
ही यादी अपूर्ण आहे; आपण याचा विस्तार करण्यास मदत करू शकता.