संजय बनसोडे

संजय बनसोडे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील सुधाकर भालेराव
मतदारसंघ उदगीर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील बाबुराव प्रेमनाथ बनसोडे
निवास उदगीर, लातूर, महाराष्ट्र, भारत
शिक्षण कला पदवीधर
गुरुकुल देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद
व्यवसाय राजकारण

संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदगीर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][]

वैयक्तिक जीवन

लातूरमधुन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, बनसोडेंनी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथून पदवी शिक्षण घेतले.

राजकीय कार्यकाळ

पुर्व

बनसोडे यांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे काम सुरू केले. १९९२ला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. नामांतर चळवळीमध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रारंभी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अशी जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

निवडणुका

२०१४ च्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीत झालेल्या तिरंग्या लढाईत बनसोडेंचा निसटता पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी पाच वर्षे मतदारसंघात काम केले. संघटनात्मकदृष्ट्या भारतीय जनता पक्षाचा गड असणाऱ्या उदगीर विधान सभा मतदारसंघात तब्बल २०,००० मतांच्या अंतराने भाजपच्या डाॅ.अनिल कांबळेयांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्या रूपाने उदगीरला ३५ वर्षानंतर मंत्रीपद मिळाले, त्यापुर्वी १९८४-८६ मध्ये बाळासाहेब जाधव हे मंत्री होते.

मंत्रीकाळ

आरोप व घोटाळे

भुषवलेली पदे

• १९९२-१९९९: प्रदेश उपाध्यक्ष, युवक काँग्रेस

• १९९९-२०१९: प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष

• २०१९-वर्तमान: सदस्य, महाराष्ट्र विधान सभा

• २०१९-वर्तमान: पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन

हे सुद्धा पहा

उदगीर विधानसभा मतदारसंघ

संदर्भ

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!