राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ]
पार्श्वभूमी
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२]
पक्षाचे चिन्ह
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.