अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस (संक्षेप: एआयएनआरसी; तमिळ: அகில இந்திய நமது ராஜ்ஜியம் காங்கிரஸ்) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. दक्षिण भारताच्या तमिळनाडू व पुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या व द्राविडी पक्षांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या एन.आर. काँग्रेसची स्थापना पुडुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी ह्यांनी २०११ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून केली.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एन.आर. काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला व पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत मात्र एन.आर. काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आले.
बाह्य दुवे
|
---|
राष्ट्रीय युत्या | |
---|
मान्यताप्राप्त राजकीय पक्ष | |
---|
मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष | |
---|
संसदेतील इतर पक्ष | |
---|
इतर नविन किंवा लहान पक्ष | |
---|
अस्ताला गेलेले पक्ष | |
---|