धनंजय पंडितराव मुंडे (जन्म १५ जुलै १९७५) हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते.[ संदर्भ हवा ]
वैयक्तिक जीवन आणि शिक्षण
मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे झाला.[१] त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत.[ संदर्भ हवा ] मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले.[ संदर्भ हवा ] तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.[२]
बलात्काराचे आरोप
२०२१ मध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले होते, नंतर ते आरोप मागे घेण्यात आले.[३] रेणू शर्मा यांची बहिण करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध होते, करुणा शर्मा पासून त्यांना दोन मुले असल्याचे मुंडे यांनी मान्य केले आहे.[४]
राजकारण
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.[ संदर्भ हवा ] सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते.[ संदर्भ हवा ] त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
- दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार [५]
- दैनिक लोकमतच्या वतीने पॉवरफुल राजकारणी पुरस्कार [६]
संदर्भ