| हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे.हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. | |
विकिपीडियावरील वगळण्याविषयीच्या धोरणात ज्ञानकोशातील आशयास लागू होणाऱ्या निकषांमध्ये न बसणारी पाने कशी ओळखावीत व विकिपीडियावरून कशी वगळावीत याबद्दलचे विवरण दिले आहे.
विकिपीडियावरील पान वगळल्यावर त्या पानाची चालू आवृत्ती, तसेच पूर्वीच्या सर्व आवृत्त्या सार्वजनिक दृष्टीतून नाहीशा होतात. लेखातील मजकूर वगळण्यात व पान वगळण्यात फरक असा, की वगळलेला मजकूर आवृत्ती उलटवून अथवा पुन्हा मजकूर भरून परत आणता येतो; मात्र पान वगळल्यावर विशेषाधिकार असलेल्या सदस्यांशिवाय कुणालाही वगळलेले पान परत आणता येत नाही. पान वगळण्याचे अधिकार केवळ प्रचालक असलेल्या सदस्यांना असतात. प्रचालकांना वगळलेली पाने पाहता येतात, तसेच वगळलेली पाने माघारी आणता येतात. प्रचालकांच्या या सर्व कृतींची अर्थातच नोंद होत असते. एखादे पान वगळण्याविषयी पुरेशी सहमती नसल्यास किंवा संदिग्धता असल्यास, प्रचालक पान सहसा वगळत नाहीत.
वगळण्याची कारणे
__DTELLIPSISBUTTON__{"threadItem":{"headingLevel":2,"name":"h-","type":"heading","level":0,"id":"h-\u0935\u0917\u0933\u0923\u094d\u092f\u093e\u091a\u0940_\u0915\u093e\u0930\u0923\u0947","replies":[]}}-->
एखादे पान वगळण्याची कारणे खालीलपैकी (तसेच या सूचीशिवाय अन्यही) असू शकतात :
- प्रताधिकार उल्लंघन घडले असल्यास किंवा विकिपीडियाच्या अ-मुक्त आशयविषयक धोरणाच्या निकषात न बसल्यास.
- ज्ञानकोशीय दृष्टिकोनातून उल्लेखनीयता सिद्ध होत नसलेल्यास.
- विषयाशी संबंध नसलेला जाहीरातबाजीसदृश आशय/मजकूर (अर्थात याला जाहीरातक्षेत्राविषयीच्या लेखांचा अपवाद मानावा) किंवा स्पॅम आशय/मजकूर असल्यास.
- वापरात नसलेले किंवा निरुपयोगी साचे.
- वाचनीय मजकूर न भरता कोरा (किंवा प्रायः कोरा) लेख बनवला असल्यास.
- अनाथ पान/न लागणारे वर्गपान/मोडकी पुर्ननिर्देशन
- लेखकाची/लेखिकेची विनंती
- उत्पात/नासाड
- गोपनीयता उल्लंघने/चारीत्र्यहनने
- अशुद्ध शीर्षक, अयोग्य शीर्षक किंवा इतर भाषिक शीर्षक
प्रक्रिया
__DTELLIPSISBUTTON__{"threadItem":{"headingLevel":2,"name":"h-","type":"heading","level":0,"id":"h-\u092a\u094d\u0930\u0915\u094d\u0930\u093f\u092f\u093e","replies":["h-\u0935\u0917\u0933\u0923\u094d\u092f\u093e\u091a\u093e_\u092a\u094d\u0930\u0938\u094d\u0924\u093e\u0935-\u092a\u094d\u0930\u0915\u094d\u0930\u093f\u092f\u093e","h-\u0935\u0917\u0933\u0923\u094d\u092f\u093e\u091a\u0940_\u0915\u093e\u0930\u0935\u093e\u0908-\u092a\u094d\u0930\u0915\u094d\u0930\u093f\u092f\u093e"]}}-->
वगळण्याचा प्रस्ताव
एखादे पान वगळावयाचे असल्यास त्या पानावर {{पानकाढा | कारण = }}
हा साचा, शक्यतो प्रस्तावाचे कारण स्पष्ट लिहून, लावावा. प्रस्तावावर चर्चा घडून त्यावर आक्षेप आल्यास, सर्वसाधारण सहमती मिळेपर्यंत पान वगळू नये.
वगळण्याची कारवाई
वगळण्याचा प्रस्ताव आलेल्या पानास वाचवण्यासाठी ठराविक मुदतीत (सध्याच्या संकेतांनुसार एक महिनाभरात) बहुमत न मिळाल्यास, असा लेख वगळण्याची कारवाई प्रचालकांना करता येईल. लेख वगळताना प्रचालकांनी बदलांच्या आढाव्यामध्ये कारवाईच्या पुष्ट्यर्थ थोडक्यात कारण नोंदवावे.
|
---|
सर्वसाधारण | |
---|
प्रकल्पस्तरीय तत्त्वे | |
---|
आशयविषयक धोरणे | |
---|
आशयविषयक मार्गदर्शक तत्त्वे | |
---|
शैलीविषयक संकेत | |
---|
|