राजेश अंकुश टोपे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभागाचे २०१९ साली झालेले मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
वैयक्तिक जीवन
टोपे यांचा औरंगाबाद, महाराष्ट्र येथे ११ जानेवारी १९६९ रोजी जन्म झाला. मनिषा टोपेशी त्यांनी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. तेे जालना येेथे राहतात.
राजकीय कार्यकाळ
टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. १९९९,२००४, २००९, २०१४ व २०१९ या सलग पाच विधानसभा निवडणूकात ते घनसावंगी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात ते सार्वजनिक आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्री झाले.क
भुषवलेली पदे
• १९९९-२०२०: सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
• २०१९-वर्तमान: मंत्री, महाराष्ट्र शासन
संदर्भ