राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) (संक्षिप्त.राशप) हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख राज्ये महाराष्ट्र आणि केरळ आहेत. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा माणूस" आहे.[१]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे पक्ष फोडून ३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत युती सरकारमध्ये सामील झाले. भारताच्या निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नांव दिले व चिन्ह म्हणून नवीन चिन्ह तुतारी वाजवणार भोई(माणूस) राज्यसभेच्या निवडणुकीनंतरच्या अपिलावर मान्य केले. या नवीन पक्षाची स्थापना ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली.[२]
२०२४ निवडणूकीमधील कामगिरी
- लोकसभा: १० पैकी ८ खासदार लोकसभेत
- विधानसभा: १४ आमदार महाराष्ट्र विधानसभेत
संदर्भ
|
---|
राष्ट्रीय युत्या | |
---|
मान्यताप्राप्त राजकीय पक्ष | |
---|
मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष | |
---|
संसदेतील इतर पक्ष | |
---|
इतर नविन किंवा लहान पक्ष | |
---|
अस्ताला गेलेले पक्ष | |
---|