सिद्धार्थ रामचंद्र जाधव (२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.
परिचय
सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला.
चित्रपट कारकीर्द
नाटके
- जागो मोहन प्यारे
- तुमचा मुलगा करतोय काय
- लोच्या झाला रे
- गेला उडत
दूरचित्रवाणी मालिका
- हसा चकट फू
- घडलंय बिघडलंय
- आपण यांना हसलात का?
- बा, बहू और बेबी (हिंदी)
- हे तर काहीच नाय
- आता होऊ दे धिंगाणा
संदर्भ
बाह्य दुवे