डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ हे डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदौर, मध्य प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे.[१]डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ सामाजिक शास्त्र अधिनियम, २०१५च्या अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीत इ.स. २०१६ मध्ये हे विद्यापीठ स्थापन केले.[२]सामाजिक शास्त्रविषयक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे हे भारताच्या पहिलेच विद्यापीठ आहे.[३]