डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[१]
निकष
पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[१]
- दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
- समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम
- अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.
स्वरूप
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ