इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स ही अमेरिकेतील एक संस्था आहे. दलितांच्यामानवी हक्कासाठी लढा देण्याच्या उद्देशाने डी.बी. सागर यांनी २१ मार्चइ.स. २००६ रोजी या संस्थेची स्थापना केली आहे.[१] अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे या संस्थेचे कार्यालय आहे. लंडन येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या संस्थची पायाभरणी केली. सामाजिक न्यायाची चळवळ उभारण्यासाठी ही संस्था जगभरात काम करते.