मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.[४]
इतिहास आणि क्षमता
१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे भारतीय गव्हर्नर जनरललॉर्ड ऑकलंड ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरून दिले गेले होते.[५] मैदान शहराच्या बी. बी. डी. बाग क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आहे. सुरुवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतु नंतर बायबल मधील इडन गार्डनवरून प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.[६] मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी मैदानाचे नूतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे.[७][८]; नूतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हणले जाते, परंतु त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.[२]
मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.[२] इडन गार्डनवर खेळवले गेलेले हिरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.[९] इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणाऱ्या आणि गलका करणाऱ्या प्रेक्षकांबद्दल ओळखले जाते. असे म्हणले जाते की "गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही."[१०][११] बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांच्या नावावरून दिले गेले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. आयपीएलचे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड आहे.
उल्लेखनीय घटना
१९४६ साली, फॉर्मात असलेल्या मुश्ताक अलीलाऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी ("नो मुश्ताक,नो टेस्ट" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले.[१२]
१९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.[२]
१६ ऑगस्ट १९८० च्या पूर्व बंगाल आणि मोहन बागान संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.[१३]
क्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
हिरो चषक, १९९३-९४ मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेल्या, शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना, फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.[१४]
पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७च्या दुसऱ्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.
१९९९ मध्ये, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा धक्का लागल्याने धावचीत झाला. अख्तरने तेंडुलकरच्या मार्गात अडथळा आणला आणि गर्दीचा क्षोभ झाला, त्यामुळे पोलिसांन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढावे लागले. सामना रिकाम्या मैदानात सुरू राहिला.[१५]
कपिल देवने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.[१६]
हरभजन सिंगने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[१७]
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.[१८][१९]
इडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.
१३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने १७३ चेंडूंत २६४ धावा करून इतिहास रचला.[२०]
३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष स्पर्धा वेस्ट इंडीजच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकल्या.
विक्रम
मैदानावरील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम चार धावसंख्या भारताने नोंदवल्या आहेत. २००१ मध्ये ६५७-७, २०१० मध्ये ६४३-६, १९९८ मध्ये ६३३-५, आणि २०११ मध्ये ६३१-७.[२१]
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावरी सर्वाधिक धावसंख्या ५ बाद ४०४ ही २०१४ साली भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती. त्याखालोखाल २००९ मध्ये भारताने ३१७-५, आणि श्रीलंकेने २००९ मध्येच ३१५ धावा केल्या होत्या.[२४]
इडन गार्डन्सवर सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड दरम्यान २००१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यामधील पाचव्या गड्यासाठीची ३७६ धावांची आहे.[२७] आणि एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट भागीदारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीर आणि विराट कोहली दरम्यान २२४ धावांची आहे.[२८]
१३ नोव्हेंबर २०१४ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या.
नूतनीकरण
क्रिकेट विश्वचषक, २०११ आधी इडन गार्डन्सच्या नूतनीकरणाचे काम घेतले गेले.[२९] क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नूतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरूप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करून ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.
नूतनीकरणाच्या अपुऱ्या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.[३०]
मैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केन्या वि झिम्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या ति किटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे.[३१]
आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी
कसोटी
आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]: