इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात
सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले.
२०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले.
एखादा संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत.[४३][४४]
१. वार्षिक खेळाडू लिलावातून
२. इतर संघातील भारतीय खेळाडूंना 'विकत' घेऊन.
३. कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन.
४. इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून.
५. असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन.
प्रत्येक खेळाडूचा व्यवहार त्याच्या संमतीने हा ठरवलेल्या व्यापारी चौकटीत केला जाऊ शकतो. संघमालकला जुन्या व नवीन करारातील फरक द्यावा लागेल. जर नवीन करार हा पूर्वीच्या करारापेक्षा कमी किमतीचा असेल तर पूर्वीच्या संघमालक व खेळाडू हे फरक सोसतात.[४५]
संघाच्या बांधणीसाठीचे काही नियम असे आहेत:
संघात किमान १६ खेळाडू आणि एक संघ फिजियो व एक संघ प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
संघात ८ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू व खेळताना ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवले जाऊ नयेत.
२००९ पासून परदेशी खेळाडूंची संख्यामर्यादा १० करण्यात आली आहे.
प्रत्येक संघात किमान ८ स्थानिक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
प्रत्येक संघामध्ये खालील २२ भारतीय संघांतील किमान २ खेळाडू असावेत.
राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले. खेळाडूंच्या लिलावाकरिता संघाला५ दशलक्ष डॉलरचे बंधन घालण्यात आले. २२ वर्षाखालील किमान वार्षिक मानधन $२०००० निश्चित करण्यात आले, तर बाकीच्यांना $५०००० निश्चित करण्यात आले. आयकॉन खेळाडूंना त्या-त्या संघात सर्वांत महाग बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा १५% अधिक रक्कम द्यावी लागेल.
इंडियन प्रीमियर लीगचे पहिले पर्व १ जून २००८ला संपले, पहिल्या पर्वात भरमसाठ भांडवली गुंतवणूक असल्याने, संघ फायद्यात असतील असे कोणालाही वाटले नव्हते. खालील सारणीत दाखवल्याप्रमाणे फायदा-तोटा आहे.[४६]
^ abचुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2008 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; २००८ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^ abcचुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; २००९ आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2010 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2011 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2012 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
^ abचुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 2013 आयपीएल अंतिम सामना धावफलक, स्थान, सर्वात मौल्यवान खेळाडू माहिती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही