इंडियन प्रीमियर लीगचा २०२०चा मोसम हा आयपीएल १३ किंवा आयपीएल २०२० म्हणूनही ओळखली जाणारी स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये खेळवली गेली. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा तेरावा हंगाम होता. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले.
यजमान आणि कार्यक्रम
सुरुवातीस ही स्पर्धा १५ मार्चपासून सुरू होणार होती परंतु कोव्हिड महामारीमुळे ही १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली. १४ एप्रिल रोजी भारतातील लॉकडाउन ३ मे पर्यंत लागू झाल्यावर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. २ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा कार्यक्रम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान निश्चित केला गेला. त्याच वेळी या स्पर्धेचे स्थळ भारतातून संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविण्यात आले.[१][२][३] १० ऑगस्ट रोजी भारत सरकारने स्पर्धा संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविण्यास परवानगी दिली.[४] ६ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.[५]
याआधी ४ ऑगस्ट रोजी विवोने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पदावरून माघार घेतली.[६][७] ड्रीम११ या काल्पनिक खेळाचे आयोजन करणाऱ्या कंपनीने २ अब्ज २२ कोटी रुपये बीसीसीआयला देउन विवोची जागा घेतली.[८][९][१०] याचबरोबर अनअकॅडेमी या भारतीय शिक्षणतंत्रज्ञान कंपनीला २०२२ पर्यंत सहकारी करून घेतले गेले.[११]
कोव्हिड-१९चा प्रभाव
जगात पसरलेल्या कोव्हिड-१९च्या साथीमुळे स्पर्धेचा कार्यक्रम आणि स्थळ बदलले गेले. स्पर्धा संयुक्त अरब अमिरातींमध्ये हलविताना २० ऑगस्ट पासून स्पर्धा सुरू करण्याचा बेत केला गेला होता परंतु अमिरातींवरील प्रवासबंधनांमुळे हा पुढे ढकलण्यात आला.[१२] स्पर्धेच्या आधी करण्यात आलेल्या कोव्हिड चाचण्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अकरा खेळाडूंना लागण झाल्याचे आढळून आले.[१३][१४] स्पर्धा सुरू असताना खेळाडू व संघातील इतर सदस्यांवर २०,००० चाचण्या घेतल्या जातील.[१५][१६] मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेदरम्यान स्मार्ट रिंग नावाचे उपकरण वापरेल. याद्वारे खेळाडूंच्या तब्येतीबद्दलची माहिती गोळा केली जाईल.[१७][१८]
संघ
मैदाने
संदर्भ