सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधित्व करतो.[१] सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत.[२] कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.[३] टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[४][५]
संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला. या संघाने २०१८ च्या आय.पी.एल.साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे. २०१६ या वर्षी या संघाने आय.पी.एल.चे विजेते पद पटकावले होते.
संदर्भ