२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.