| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. [१] भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत.
क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे.
इतिहास
बाराबती मैदान कटक [२]येथे देशातील तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवून मालिकेत २-१ असे यश मिळवले. पाच मोसमांनंतर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला गेला, ज्यामध्ये अंदाज करता न येण्याइतकी उसळी मिळणाऱ्या, काम पुर्णपणे न झालेल्या खेळपट्टीने श्रीलंकेच्या संघाचे स्वागत केले. दिलीप वेंगसरकर, त्यावेळी आपल्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर होता, त्याने त्याची कसोटी क्रिकेटमधील १६६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सामन्यात दोन्ही संघांमधील इतर कुणालाही ६० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचा दोनवेळा सर्वबाद करून भारताने १ डाव आणि ६७ धावांनी विजय मिळवला. कपिल देवने त्याचा ३००वा बळी ह्याच सामन्यात रुमेश रत्नायकेच्या रूपाने मिळवला.
१९९५-९६ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध ह्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकमेव कसोटी सामन्यावर पावसाचा खूप वाईट परिणाम झाला. सामन्यात केवळ १७७.५ षटकांचा खेळ होऊ शकला. पुनरागमन करणाऱ्या नरेंद्र हिरवाणीने न्यू झीलंडचा एकमेव डावात ५९ धावांमध्ये ६ बळी घेऊन ह्या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली.
ह्या मैदानावर कसोटी सामने आता नियमित होत नसले तरीही त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने नियमित पणे होतात. दोन कसोटी सामन्यांतून भारताने एक कसोटी जिंकली आहे. तर, १७ एकदिवसीय सामन्यांपैकी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
मैदानावर रिलायन्स विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे आणि नेहरू चषक, १९८९ स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय बाराबती स्टेडियममध्ये १९९६ विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील काही सामने खेळवले गेले होते.
२०१२ मध्ये, ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बाराबती मैदानावरील इनडोअर हॉलला सचिन तेंडुलकरचे नाव दिले.
आकडेवारी आणि विक्रम
- श्रीलंकेविरुद्ध २ नोव्हेंबर २०१४ रोजी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी २३१ धावांची सलामी दिली, जी आतापर्यंतची भारतातर्फे १ल्या गड्यासाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे.[३]
आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी
कसोटी
आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:
एकदिवसीय
आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:
टी२०
आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]:
संदर्भ आणि नोंदी
|
---|
कसोटी | मध्य | |
---|
पूर्व | |
---|
उत्तर | |
---|
दक्षिण | |
---|
पश्चिम | |
---|
|
---|
एकदिवसीय | मध्य | |
---|
पूर्व | |
---|
उत्तर | |
---|
दक्षिण | |
---|
पश्चिम | |
---|
|
---|