राजकोट (गुजराती: રાજકોટ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. राजकोट शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात राजधानी गांधीनगरपासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट अहमदाबाद, सुरत व वडोदरा खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.
महात्मा गांधींचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.
बाह्य दुवे