जमशेदपूर (संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ) हे भारताच्याझारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.