शेवटचा बदल १० मार्च २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (जुने नाव: सुब्रता रॉय सहारा स्टेडियम) हे स्टेडियम भारताच्यापुणे शहराजवळील एक क्रिकेटस्टेडियम आहे. पुण्याबाहेरील गहुंजे ह्या गावाजवळ मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाच्या बाजूला असलेले हे स्टेडियम एप्रिल २०१२ मध्ये बांधले गेले.
२०१३ साली पुणे वॉरियर्स संघावर बंदी घालण्यात आल्यामुळे व सहारा परिवार आर्थिक संकटात सापडल्यामुळे ह्या स्टेडियमचा वापर कमी झाला. सहाराकडून करारित मानधन न मिळाल्यामुळे असोसिएशनने ह्या स्टेडियमचे नाव पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे ठेवले.
या मैदानातील प्रेक्षककक्षाची रचना कोणत्याही बैठकीवरून संपूर्ण मैदानाचा देखावा दिसेल अशी करण्यात आली आहे. या मैदानावर वालुकामय माती पसरवून त्यावर गवत घातलेले आहे. यामुळे कितीही पाउस पडला तरी पाण्याचा निचरा काही मिनिटांतच होतो आणि मैदान पुन्हा खेळण्यास लवकर तयार होते.