शेवटचा बदल ऑक्टोबर २५, २०१६ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
महाराष्ट्र, भारतातीलनागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे नागपूर-वर्धा रस्त्यावर असलेल्या जामठा या गावी स्थित आहे.
सचिन तेंडुलकर म्हणाला,"ह्या मैदानावर अपेक्षेपेक्षा चांगल्या सुविधा आहेत." रिकी पाँटिंगने चेंजिंग रुमच्या सुखसोईंची प्रशंसा केली.[२]डेक्कन चार्जर्सवर दोन-धावांनी विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न “मैदानाची मोठ्या आकाराबाबत” आनंदित होता. “मायकेल लंबने मिड-विकेटच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाने झेलला. आता, जर हे एम.ए. चिदंबरम मैदान किंवा एम. चिन्नास्वामी मैदान असते तर चेंडू जणू संघाच्या हॉटेलकडे जाणाऱ्या टॅक्सीमध्येच पडला असता. आपल्याला अशाच मोठ्या मैदानांची गरज आहे.,” वॉर्न म्हणाला.[३] मैदान सरळ ८० यार्ड आणि ८५ यार्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने आहे, त्यामुळे (खेळण्याच्या क्षेत्रानुसार) ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे.[४]
व्हीसीए मैदान, नागपूरचे विहंगम दृश्य
कसोटी विक्रम
सर्वोच्च सांघिक धावसंख्या: ५६६/८घो, भारत वि न्यू झीलंड, २०१०-११.