ग्वाल्हेर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर ग्वाल्हेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
भौगोलिक दृष्टि ने ग्वालियर म.प्र. राज्यातील उत्तरे कडे स्थित आहे. हे शहर आणि येथील प्रसिद्ध दुर्ग उत्तर भारतील प्राचीन शहरांचे केन्द्र होते. हे शहर गुर्जर प्रतिहार राजवंश, तोमर आणि बघेल कछवाहों,गोत्र यांची राजधानी होता. यांच्या हस्ते सोडलेले प्राचीन चिन्ह स्मारके, किल्ले, महलांच्या रूपात सापडतील. संभाळून ठेवलेले अतीतचे भव्य स्मृति चिन्ह या शहराला पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण बनवतात.
आज ग्वालियर एक आधुनिक शहर आहे आणि एक प्रसिद्ध औद्योगिक केन्द्र ही आहे. ग्वालियरला गालव ऋषिची तपोभूमि पण म्हणले जाते. १७ जून १८५८ रोजी भारताची महान पराक्रमी वीरांगना झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे ब्रिटिश सैन्यासोबत महा भयंकर युद्ध झाले. आणि सायंकाळी राणी लक्ष्मीबाई ह्या स्वातंत्र्यच्या बलिवेदीवर धारातीर्थी पडल्या. कोटा की सराय जवळ फुलबागेत महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे समाधी स्थान आहे. पूर्वी येथे बाबा गंगादास यांचे विस्तारित मठ होते. मठातच बाईसाहेबांचे अंत्यसंस्कार झाले होते. तिथे आता सिंधिया सरकारने स्मारक बांधले आहे.