हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे एक प्रमुख मैदान आहे.जुन १९९४ आधी हे खेत्तारमा क्रिकेट स्टेडियम म्हणुन ओळखल्या जायचे.श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतुन साकारलेले हे मैदान आहे. याची आसनक्षमता ३५,००० आहे.श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्याने याचे उदघाटन करण्यात आले. या मैदानावर पहिला कसोटी सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा खेळला गेला.या मैदानाची धावपाट्टी संथ आहे.