ईस्ट बंगाल हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९२० साली स्थापन झालेला ईस्ट बंगाल भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.
ईस्ट बंगालने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या ईस्ट बंगाल भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.
ईस्ट बंगालची मोहन बागान ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
साचा:आय−लीग