तालबद्ध जलतरण (इंग्लिश: Synchronized swimming) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९८४ सालापासून खेळवला जात आहे. हा खेळ सध्या केवळ महिलांसाठी असून ह्यात सांघिक व जोडी असे दोन प्रकार खेळवले जातात. रशिया, अमेरिका व कॅनडा ह्या देशांनी आजवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.