भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकाएप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे.[१] या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुकांपेक्षा ही संख्या ४ कोटी ३० लाखांनी जास्त आहे. या निवडणुकीसाठी २००९ च्या अंदाजपत्रकात ११ अब्ज २० कोटी रुपयांची (१ कोटी ८० लाख युरो) तरतूद करण्यात आलेली आहे.[२] या निवडणुकी बरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये त्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेण्यात येतील.
भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपदासाठी थेट निवडणुक नसते तर निवडलेले संसदसदस्य पंतप्रधान निवडतात. तरीही प्रमुख पक्षांनी जर त्यांना बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदी कोण असेल याची जाहीतार केली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधीच्या वक्तव्यानुसार यु.पी.ए.कडून सद्य पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असतील.[५]राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवारने आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले आहे.[६] यानंतर मनमोहनसिंग यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली[७] व त्यामुळे पुढील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल नव्याने अटकळी सुरू झाल्या आहेत. याला खीळ घालण्यासाठी फेब्रुवारी ६, २००९ रोजी सोनिया गांधीने आपल्या लेखात मनमोहनसिंगच यु.पी.ए.चे पंतप्रधान उमेदवार असल्याचे प्रतिपादन केले.[८]
संसदेतील मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाने डिसेंबर ११, २००७ रोजी जाहीर केले की लालकृष्ण अडवाणी त्यांचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार असतील.[९] जानेवारी २३, २००८ रोजी अडवाणींना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली.[१०]. रा.लो.आ.मधील इतर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
तिसरी आघाडी
कम्युनिस्ट पक्ष व इतर प्रादेशिक राजकीय पक्षांनी वरील दोन आघाड्यांना पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की जर त्या पक्षाला पुरेश्या जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाशी जुळवून घेउन सरकार स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यास त्यांची तयारी आहे.साचा:Fact. मायावती या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. मायावतीने पंतप्रधानपद मिळवण्यासाठी कोणाशीही संधान बांधण्याची तयारी दाखवली आहे.[११] इतर कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही.