या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
या लेखात सत्यापनासाठीअतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीयसंदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते.
डॉ.मनमोहन सिंह (२६ सप्टेंबर, १९३२ - २६ डिसेंबर, २०२४) हे २२ मे २००४ पासून २६ मे २०१४पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेतआसामचे प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[१]
The Accidental Prime Minister : मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ (मूळ लेखक : संजय बारू. The Accidental Prime Minister याच नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.)
अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, अविनाश कोल्हे)
डॉ. मनमोहनसिंह - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]
चित्रपट व मालिका
द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर : या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गान्धी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.[२]
प्रधानमंत्री : या नावाची एक मालिका एबीपी माझावर प्रसारित झाली होती. त्यातील काही भागात मनमोहन सिंग यांची देखील कथा चित्रित केली गेली.[३]