Elecciones generales de India de 1989 (es); ভারতের সাধারণ নির্বাচন, ১৯৮৯ (bn); élections législatives indiennes de 1989 (fr); eleccions generals índies de 1989 (ca); १९८९ लोकसभा निवडणुका (mr); Parlamentswahl in Indien 1989 (de); ୧୯୮୯ ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); 1989年印度大选 (zh); splošne volitve v Indiji leta 1989 (sl); 1989年インド総選挙 (ja); بھارت عام انتخابات، 1991ء (ur); Parlamentsvalet i Indien 1989 (sv); 1989年印度大选 (zh-hans); הבחירות ללוק סבהה (1989) (he); ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন, ১৯৮৯ (as); 1989年印度大選 (zh-hant); भारतीय आम चुनाव, १९८९ (hi); 1989 భారత సార్వత్రిక ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ 1989 (pa); 1989 Indian general election (en); الانتخابات العمومية الهندية 1989 (ar); ełesion lejislative de Ìndia del 1989 (vec); 1989 இந்தியப் பொதுத் தேர்தல் (ta) بھارت میں عام انتخابات (ur); general election in India (en); Wahl zur 9. Lok Sabha 1989 (de); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); general election in India (en); élections en Inde (fr); בחירות בהודו (he); இந்தியாவில் பொதுத் தேர்தல் (ta) 1989年選挙 (ja); הבחירות בהודו (1989) (he); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ, ୧୯୮୯ (or)
मागील लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १९८९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका झाल्या. राजीव गांधींनी गेल्या निवडणुकीत ४१४ जागांच्या अभूतपूर्व विजयाने (प्रामुख्याने त्यांच्या आईच्या हत्येमुळे झालेल्या दुःखामुळे) शेवटची निवडणूक जिंकली असली तरीही, या निवडणुकीत त्यांना त्यांच्या शासनावरील घोटाळ्यांचा आरोपाचा सामना करावा लागला.
बोफोर्स घोटाळा, १९८४ च्या भोपाळ दुर्घटनेत सामील असलेल्या आदिल शहरयारला वाचवण्याचा गांधींचा कथित प्रयत्न, शाहबानो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप, आसाममधील वाढती बंडखोरी, पंजाबमधील बंडखोरी, श्रीलंकेतील यादवी युद्धात भारतीयांचा सहभाग; अश्या काही समस्या होत्या ज्या त्यांच्या सरकारकडे बोट रोखून होत्या. राजीव यांचे सर्वात मोठे टीकाकार विश्वनाथ प्रताप सिंग होते, ज्यांच्याकडे सरकारमध्ये अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची खाती होती.
परंतु सिंग यांची लवकरच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी अरुण नेहरू आणि आरिफ मोहम्मद खान यांच्यासोबत जनमोर्चा पक्ष काढला आणि अलाहाबादमधून अपक्ष खासदार म्हणून पुन्हा लोकसभेत प्रवेश केला.[४]
काँग्रेस पक्षावरील मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप दूर करण्यासाठी, राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये अयोध्येतील विवादित बाबरी मशिदीचे दरवाजे उघडण्याचे पाऊल उचलले, [५] ज्यामुळे अनवधानाने जागेवरील विवादाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली. मशीद पाडल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू मंदिर बांधण्याच्या निवडणुकीतील आश्वासनामुळे भाजपला देशातील हिंदू बहुसंख्य लोकांकडून मोठा पाठिंबा मिळू शकला.
वाढत्या अशांतता आणि बोडोंच्या बंडामुळे आसाममध्ये मतदान झाले नाही, ज्याची परिणती गोहपूर येथे ५३५ लोकांच्या हत्याकांडात झाली. शिवाय, गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचेगोवा आणि दमण आणि दीवमध्ये विभाजन करण्यात आले आणि गोव्याने २ जागा राखून ठेवल्या आणि दमण आणि दीवाअठी १ जागा मिळाली. अशा प्रकारे लोकसभेच्या एकूण जागा १ ने वाढून एकूण ५४३ झाल्या. आसाममध्ये कधीही निवडणूक झाली नसल्याने या निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागा ५२९ पर्यंत होत्या.
जनता दलाचे प्रमुख असलेले व्ही.पी. सिंग यांना भाजप आणि सीपीआय(एम) च्या बाहेरील पाठिंब्यासह राष्ट्रीय आघाडी सरकारचे नेते म्हणून निवडण्यात आले.[७] २३ ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या ठिकाणी निघालेली राम रथ यात्रा रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी समस्तीपूरमध्ये अडवाणींना अटक करण्याच्या निर्णयाला सिंग यांनी पाठिंबा दिल्याने युती तुटली. या घटनेनंतर भाजपने सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला, ज्यामुळे त्यांना ७ नोव्हेंबर १९९० रोजी संसदीय विश्वासाचे मत गमावावे लागले.[८]
चंद्रशेखर यांनी ६४ खासदारांसह जनता दलापासून फारकत घेतली आणि १९९० मध्ये समाजवादी जनता पक्षाची स्थापना केली. त्यांना काँग्रेस कडून बाहेरून पाठिंबा मिळाला आणि ते भारताचे ८ वे पंतप्रधान बनले. चंद्रशेखर सरकार राजीव गांधी यांच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप करून काँग्रेस ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर अखेर २१ जून १९९१ रोजी त्यांनी राजीनामा दिला.