ज्योती बसू (बंगाली: জ্যোতি বসু) (जुलै ८, इ.स. १९१४ - जानेवारी १७, इ.स. २०१०) भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे. ते इ.स. १९६४ ते २००८ पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरोचे सदस्य होते.
कारकिर्दीची वैशिष्ट्ये
पक्की वैचारिक बैठक, सातत्याने २३ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना शेतकरी-श्रमिकांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या अनेक योजना, राष्ट्रीय रंगमंचावर बजावलेली महत्त्वाची भूमिका, केंदातील आघाड्यांची गणिते मांडण्याची व सोडवण्याची कुशलता, हुकलेले पंतप्रधानपद आदी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्ची वैशिष्ट्ये सांगता येतील.
राजकीय प्रवास
कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन'चेही ते सदस्य होते. कायद्याची पदवी घेऊन भारतात परतल्यानंतर बसू यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला पूर्णवेळ वाहून घेतले. १९४४ला बसू ट्रेड युनियनमध्ये कार्यरत झाले. १९४६ च्या निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार हुमायुन कबिर यांचा रेल्वे मतदारसंघातून पराभव करून बसू यांनी राजकीय पटलावर प्रवेश केला. स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट पाटीर्वर बंदी आणल्यानंतर ते भूमीगत होते. बंगालमध्ये ट्रामचे भाडे वाढवल्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी बसूंना बरनगोरे मतदारसंघातून राय हरेंदनाथ चौधरी यांच्या विरोधात निवडून दिले. १९६७ आणि १९६९ मध्ये बसूंनी पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर आठ वर्षांनी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. ही धुरा त्यांनी सलग २३ वषेर् सांभाळली. बसूंच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्त अनेकदा त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लागले होते. १९८० मध्ये त्यांनी काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांची बैठक कोलकातात घेतली होती. केंदातील काँग्रेस सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशांतील मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा तो प्रयत्न होता. १९८५ मध्येही दाजिर्लिंगमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांना हिल कौन्सिल स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. कम्युनिस्ट पक्षात असूनही बसू यांनी इतर मतांबद्दल दुराग्रह ठेवला नाही, हे त्यांचे मोठेपण. २००४ मध्ये काँग्रेससह यूपीए सरकार स्थापन करण्यात बसू यांचा मोलाचा वाटा होता. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली होती. मात्र आपल्या पक्षाची शिस्त आणि दुराग्रहाखातर त्यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागले होते. राजकीय कामकाजात इंदिरा गांधींपासून नरसिंह रावांपर्यंत सर्व पंतप्रधान त्यांचा सल्ला घेत असत. १९७०मध्ये ज्योती बसू यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, मात्र त्यातून ते बचावले. 'कम्युनिस्ट कधीच रिटायर होत नाहीत', असे म्हणत आयुष्याच्या शेवटापर्यंत कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला. मात्र गेली काही वर्षे ते राजकारणापासून दूर होते. १९८७ मध्ये देशातील प्रमुख इंग्रजी दैनिकांनी केलेल्या निरीक्षणात सर्वाधिक 'इमानदार' म्हणून ज्योती बसू यांची निवड झाली होती. त्यांची गणना लालबहादूर शास्त्री आणि जवाहरलाल नेहरू अशा नेत्यांमध्ये होऊ शकते, असे मत वृत्तपत्रांनी व्यक्त केले होते. त्यांचे विरोधकदेखील त्यांना योग्य आणि व्यावहारिक प्रशासक मानत. ज्योती बसू पश्चिम बंगालमध्ये असताना तेथे काँग्रेस सत्तेवर येऊच शकत नाही, असे खुद्द काँग्रेस नेतेच म्हणत.
योगदान
- १९७७ मध्ये सत्तेवर येताच बसूंनी जमीन सुधारणेवर लक्ष दिले. 'ऑपरेशन बरगा'द्वारे हिश्शांवर शेती करणाऱ्या दहा लाख लोकांना त्यांनी जमिनीचा हक्क मिळवून दिला आणि याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांची सहानभूती मिळवण्यात झाला.
- ग्रामीण भागातील लोकांची आथिर्क स्थिती सुधारावी, यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या. दारिद्य रेषेखाली असलेल्यांचे प्रमाण वीस वर्षांत ५२.२ टक्क्यांवरून २७.६ टक्क्यांवर आले.
- पंचायत व्यवस्था मजबूत करण्याचे तिसरे महत्त्वाचे काम त्यांनी केले. गावांचे संपूर्ण विकास कार्य पंचायतींमार्फत होऊ लागले. अशा प्रकारे राज्यातील गावागावांत माकपचा शिरकाव झाला.
निधन
रूढार्थाने भारताची भूमी कम्युनिस्ट चळवळीस फारशी अनुकूल नसताना पश्चिम बंगालसारख्या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा सातत्याने फडकवीत ठेवणारे आणि एकूणातच देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या पोषणात सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांचे रविवारी १७ जानेवारी २०१० रोजी कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर गेले १७ दिवस हा योद्धा मृत्यूशी झुंजत होता. भारतीय राजपटलावर ६० वर्षांपूवीर् उठलेले वादळ अखेर शांत झाले. मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज रविवार १७ जानेवारी २०१० दुपारी ११.४७ वाजता संपली आणि कम्युनिस्टांसह तमाम राजकीय पक्षांमध्ये आणि सामान्यजनांमध्येही शोकभावना व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात पुत्र चंदन, सून व तीन नातवंडे असा परिवार आहे. ज्योतीदांची पत्नी कमल यांचे चार वर्षांपूवीर् निधन झाले. बसू यांनी नेत्रदान, देहदान केले आहे.
संदर्भ