२०२२ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेच्या]] पोटनिवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, सात राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, पोटनिवडणुका यांचा समावेश आहे.[१]
राष्ट्रपती निवडणूक
१८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली आणि २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी झाली. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली. [२]
उपराष्ट्रपती निवडणूक
६ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. त्याच दिवशी मतमोजणी झाली आणि जगदीप धनखड यांची भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. [३]
राज्य विधानसभेच्या निवडणुका
२०२२ मध्ये ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातील फक्त पंजाब व हिमाचल प्रदेश मध्ये पक्ष व मुख्यमंत्री परिवर्तन झाले.
संदर्भ
|
---|
सार्वत्रिक निवडणुका | |
---|
राज्यांतील निवडणुका | |
---|
|