२०२४ लोकसभा निवडणुका
|
|
|
|
मतदारसंघानिहाय जागा
|
|
२०२४ लोकसभा निवडणुका भारताच्या १८व्या लोकसभेचे ५४३ सदस्य निवडण्यासाठी १९ एप्रिल ते १ जून, २०२४ दरम्यान होतील. ही निवडणूक सात वेगवेगळ्या टप्प्यात होणार असून ४ जून, २०२४ रोजी निकाल जाहीर होतील. मतदारसंख्येनुसार ही निवडणूक जगातील आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी निवडणूक असेल. याआधी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका सगळ्यात मोठ्या होत्या. ४४ दिवसांचे हे निवडणूक सत्र पहिली लोकसभा वगळता सर्वाधिक लांबीचे असेल. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत.
या निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुका होतील. याशिवाय १६ राज्यांमधील ३५ जागांसाठी पोटनिवडणुकाही होतील.
पार्श्वभूमी
निवडणूक पद्धत
भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. [१] निवडून आलेले सर्व ५४३ खासदार एक-सदस्य मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळवून निवडले जातात. [२] भारत सरकारने १०४व्या घटनादुरुस्ती द्वारे अँग्लो -इंडियन समुदायासाठी राखीव असलेल्या दोन जागा रद्द केल्या. [३]
या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार हे भारतीय नागरिक, १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, मतदारसंघाचे रहिवासी असले पाहिजेत. मतदान करण्यासाठी मतदारयादीत त्यांचे नाव असणे आवश्यक आहे. मतदान करताना भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले वैध मतदार ओळखपत्र किंवा तत्सम ओळखपत्र असणे आवश्यक आहे. [४] निवडणूक किंवा इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या काही लोकांना मतदान करण्याचा अधिकार नाही. [५]
या निवडणुकीसाठी, ९६ कोटी ८० लाख लोक मतदान करण्यास पात्र आहेत. ही संख्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा सुमारे १५ कोटींनी वाढलेली आहे. [६]
वेळापत्रक
निवडणूक आयोगाने १६ मार्च, २०२४ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्यासोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली. [७] १७व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून, २०२४ रोजी संपणार आहे. [८]
मतदान कार्यक्रम
|
टप्पा
|
I
|
II
|
III
|
IV
|
V
|
VI
|
VII
|
सूचना तारीख
|
२० मार्च
|
२८ मार्च
|
१२ एप्रिल
|
१८ एप्रिल
|
२६ एप्रिल
|
२९ एप्रिल
|
७ मे
|
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
|
२७ मार्च
|
४ एप्रिल
|
१९ एप्रिल
|
२५ एप्रिल
|
३ मे
|
६ मे
|
२४ मे
|
नामांकनाची चाचणी
|
२८ मार्च
|
५ एप्रिल
|
२० एप्रिल
|
२६ एप्रिल
|
४ मे
|
७ मे
|
१५ मे
|
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
|
३० मार्च
|
८ एप्रिल
|
२२ एप्रिल
|
२९ एप्रिल
|
८ मे
|
९ मे
|
१७ मे
|
मतदानाची तारीख
|
१९ एप्रिल
|
२६ एप्रिल
|
७ मे
|
१३ मे
|
२० मे
|
२५ मे
|
१ जून
|
मतमोजणी/ निकालाची तारीख
|
४ जून २०२४
|
मतदारसंघांची संख्या
|
१०२
|
८९
|
९४
|
९६
|
४९
|
५७
|
५७
|
२०२४ च्या या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारताचे राजकारण अधिकाधिक द्विध्रुवीय बनले आहे आणि दोन प्रमुख युती उदयास येत आहेत -- विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी . या निवडणुकांत सहा राष्ट्रीय पक्ष लढतील -- भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी.
उमेदवार
रालोआने या निवडणुकीसाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत उभे केले आहे[९] तर इंडिया आघाडीचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरेल. [१०]
सर्वेक्षण
३ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊ-ईटीजी संशोधन सर्वेक्षणानुसार, ६४% लोकांनी भारताचे पुढील पंतप्रधान म्हणून विद्यमान नरेंद्र मोदी (भाजप) यांना पसंती दिली. राहुल गांधी (काँग्रेस) १७% मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. [११]
संदर्भ
|
---|
सार्वत्रिक निवडणुका | |
---|
राज्यांतील निवडणुका | |
---|
|